Share News

येळ्ळूर शिवारात पुन्हा ‘उतारा’ प्रकरण; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

बेळगाव : येळ्ळूर शिवारात मागील काही दिवसांपूर्वी एका झाडाखाली मोबाईलसह उतारा आढळल्याची घटना ताजी असतानाच, त्याच झाडाला पुन्हा उताऱ्याच्या गाठी बांधल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी अत्यंत धास्तावले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित झाड परिसरात मध्यवर्ती ठिकाणी असून शेतकऱ्यांची ये-जा त्या मार्गावरूनच असते. काही अज्ञात व्यक्तींनी पुन्हा झाडाला कापडाच्या गाठी व अन्य साहित्य बांधल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली.

यापूर्वीही याच झाडाखाली मोबाईल फोन आणि उताऱ्याचे साहित्य आढळल्याने खळबळ उडाली होती. आता पुन्हा तसाच प्रकार घडल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. काहींनी यामागे अंधश्रद्धेचा प्रकार असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान, संबंधित घटनेची माहिती स्थानिक प्रशासन व पोलिसांना देण्यात आली असून, परिसरात गस्त वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकारामागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे


Share News