सोयाबीनच्या गंजींना भीषण आग — ९० क्विंटल जळून खाक
बैलहोंगल तालुक्यातील घटना — १२ एकर पिकाचे मोठे नुकसान
कापणी करून एकत्र साठवून ठेवलेल्या सुमारे ९० क्विंटल सोयाबीनच्या गंजींना भीषण आग लागल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील देशनूर गावात घडली आहे.
१२ एकर क्षेत्रात पिकवलेल्या सोयाबीनपैकी शेतकरी सुरेश कोत्तळ यांच्या ५ एकर आणि तम्मण्णा कुरबर यांच्या ७ एकर क्षेत्रातील सोयाबीन कापणी करून साठवण्यात आले होते. मात्र आग लागून संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले असून सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वीज प्रवाहामुळे आग लागली की अज्ञात व्यक्तींचा घातपात आहे याबाबत नेसरगी पोलीस ठाण्याचे अधिकारी तपास करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दल आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

