Share News

पशु पालकांना जनावरांच्या औषधाचे वितरण

जिल्ह्यात लाळ्या खुरपत लसीकरण मोहिमेला प्रारंभ

पशु संगोपन खात्यातर्फे पशु संगोपन खात्या आवारात पशु पालकांना जनावरांच्या औषधाचे वितरण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाला बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ उपस्थित होते यावेळी त्यांनी प्रारंभी गो पूजन करून या कार्यक्रमाला चालना दिली. त्यानंतर पशुपालकांना जनावरांच्या औषधांच्या किटचे वितरण करण्यात आले. आणि पशुपालकानां गवत कापण्याची मशीन सबसिडी द्वारे देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
त्यानंतर पशु संगोपन खाते आवारात जनावरांचे औषध ठेवण्याकरिता गोडाऊन बांधण्यात येणार असल्याने त्याचा भूमिपूजन कार्यक्रम आज आमदारांच्या हस्ते पार पडला. जवळपास 50 लाख रुपये निधी ही इमारत बांधण्याकरिता आमदारांनी मंजूर केला आहे.

यावेळी बोलताना आमदार राजू सेठ म्हणाले की ज्याप्रमाणे सर्व नागरिकांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे जनावरांची काळजी सुद्धा जेणे महत्त्वाचे आहे.त्यामुळे
जिल्ह्यात लाळ्या खुरपत लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात असून विभागवार पशुवैद्यकीय डॉ. पशुपालकांच्या जनावरांना लस देण्यात येणार असल्याचे सांगितले.


Share News