Share News

व्हॅक्सिन डेपोत उद्या ‘हास्य उत्सव’

व्हॅक्सिन डेपोमध्ये उद्या बुधवारी (दि. १८) हास्य उत्सवाचे
आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहानंतर हा कार्यक्रम सुरु होणार असून याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांसह बेळगावकरांनी घ्यावा, असे आवाहन आमदार अभय पाटील यांनी केले आहे.
व्हॅक्सिन डेपोमध्ये ज्येष्ठांसाठी
विशेष सुविधा आमदार पाटील यांनी उपलब्ध करुन दिल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून बुधवारी येथे हास्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
व्हॅक्सिन डेपोतील डॉ. प्रसन्नकुमार सिनिअर सिटीजन्स् रिक्रिएशन्स सेंटरमध्ये सायंकाळी सहापासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. समस्त ज्येष्ठ नागरिकांसह बेळगावकरांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.


Share News