ऑटो नगरमध्ये ई-अस्ती प्रलंबित; रहिवाशांचे पालिकेत ठिय्या आंदोलन
ऑटो नगर परिसरातील केआयडी रहिवासी तसेच औद्योगिक आस्थापनांची ई-अस्ती नोंदणी गेल्या वर्षभरापासून महापालिकेकडून करण्यात आलेली नाही, या निषेधार्थ आज रहिवाशांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन केले.
महापालिकेच्या वारंवार पाठपुराव्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त रहिवासी मोठ्या संख्येने पालिकेत दाखल झाले आणि आपला निषेध नोंदवला. ई-अस्ती न झाल्यामुळे विविध प्रशासकीय कामांमध्ये अडचणी येत असल्याची तक्रार त्यांनी केली.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

