ब्रेकिंग – बेळगाव
बेळगावच्या क्लब रोड परिसरात बिबट्याचा पुन्हा वावर असल्याची दाट शक्यता; नागरिकांमध्ये खळबळ
सीपीएड मार्गे हिंडलग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी रात्री संशयास्पद हालचाली आढळल्याने बिबट्याच्या उपस्थितीची चर्चा रंगली.
मिळालेल्या माहितीनुसार परिसरात वावर आढळल्याच्या पार्श्वभूमीवर वनखाते व पोलिस सतर्क; अधिकाऱ्यांची साध्या वेशात गस्त सुरू.
घबराट पसरू नये म्हणून खबरदारीचे उपाययोजना वाढवण्यात आल्या. वन खात्याकडून अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा.
यापूर्वीही शहराच्या बाह्य भागात बिबट्याचा वावर दिसून आला होता; रेसकोर्स परिसरात महिनाभर धास्ती निर्माण झाली होती.
दरम्यान, क्लब रोड परिसरातील हालचालींमुळे शहरात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे
बेळगाव शहरातील क्लब रोड परिसरात बिबट्याचा पुन्हा वावर सुरू झाल्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
रविवारी रात्री क्लब रोडवरून सीपीएड मार्गे हिंडलग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पद हालचाली दिसल्याची माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे. काही नागरिकांनी या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या पार्श्वभूमीवर वन विभाग आणि पोलिस विभाग सतर्क झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून अधिकाऱ्यांनी परिसरात गस्त वाढवली आहे. शांतता भंग होऊ नये आणि अफवा पसरू नयेत यासाठी काही अधिकारी साध्या वेशात देखील पाहणी करत असल्याचे समजते.
यापूर्वीही बेळगाव शहराच्या बाह्य भागात बिबट्याचा वावर दिसून आला होता. रेसकोर्स परिसरात एका बिबट्याने महिनाभर ठाण मांडल्याची घटना घडली होती.
दरम्यान, सध्याच्या हालचालींची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून वन खात्याकडून स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

