मच्छे गावात संगोळी रायन्ना पुतळ्याची विटंबना-अज्ञातांकडून पुतळ्यावर द्रव पदार्थ फेकले
बेळगाव तालुक्यातील मच्छे गावात स्वातंत्र्यवीर Sangolli Rayanna यांच्या पुतळ्याला अज्ञात व्यक्तींनी काहीतरी वेगळा द्रव पदार्थ फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मच्छे गावातील चौकात उभारण्यात आलेल्या रायन्ना यांच्या पुतळ्यावर काही अज्ञातांनी काही पदार्थ टाकल्याची घटना सकाळी निदर्शनास आले. ही बाब समजताच स्थानिक नागरिक तसेच कन्नड पर संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त Bhushan Borase यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश देण्यात आले असून परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, आंदोलन करून रायन्ना यांचा पुतळा उभारण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. पुतळ्याची विटंबना ही कन्नड जनतेच्या भावना दुखावणारी असून दोषींना तात्काळ अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत घडली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

