Share News

भव्य ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट महाकुंभ : १२ फेब्रुवारीपासून क्रिकेटला सुरुवात

बेळगाव :
देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावान खेळाडूंना एकत्र आणणारी ‘ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा’ मुरगेंद्र गौडा पाटील यांच्या वतीने सरदार मेदानावर आयोजित करण्यात आली आहे .येत्या १२ ते २२ फेब्रुवारी दरम्यान एकूण 12 दिवस मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे आयपीएलमधील नावाजलेले युवा तारे या मैदानावर आपली चमक दाखवणार आहेत.

रोख बक्षिसांची लाखो रुपयांची बरसात

या प्रतिष्ठित स्पर्धेत विजेत्या संघांसाठी भरघोस बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे :
• प्रथम क्रमांक : ₹5,27,127 रोख व आकर्षक चषक
• द्वितीय क्रमांक : ₹2,51,127 रोख व चषक
• मॅन ऑफ द सिरीज : संपूर्ण मालिकेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूस आकर्षक स्कूटी बक्षीस

देशभरातील संघांचा सहभाग

या स्पर्धेने आधीपासूनच क्रीडाविश्वात उत्सुकता निर्माण केली असून एकूण ४८ संघांना सहभागाची संधी देण्यात आली आहे. यापैकी उत्तर प्रदेश, दिल्ली, गोवा यांसह देशातील विविध राज्यांतील सुमारे ४० संघांनी नोंदणी पूर्ण केली आहे. उर्वरित फक्त ८ जागांसाठी चुरशीची स्पर्धा सुरू आहे.

आयपीएल ताऱ्यांची मैदानात झळाळी

ही स्पर्धा केवळ स्थानिक खेळाडूंपुरती मर्यादित नसून, आयपीएलमध्ये आपली छाप पाडलेल्या अनेक युवा खेळाडूंचा सहभाग असल्याने क्रिकेटप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

नोंदणी माहिती

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघासाठी ₹15,000 प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक संघांनी तातडीने नोंदणी करून घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

११ दिवस चालणारा हा क्रिकेट महोत्सव प्रेक्षकांना थरारक क्षणांची मेजवानी देणार असून, हाय-व्होल्टेज सामन्यांसाठी क्रिकेटप्रेमी उत्सुकतेने वाट पाहत आहेत.


Share News