शहर स्वच्छतेसाठी १६ पॅकेजीस
२९ कोटी ४९ लाखांच्या निविदा
ठेकेदारांना आवाहन
बेळगाव :
शहर स्वच्छतेसाठी महापालिकेकडून एकूण १६ निविदा काढल्या असून २९ कोटी ४० लाखांच्या या निविदा आहेत. स्वच्छता कर्मचारी, वाहने, चालक आणि सुपरवायजर पुरविण्याबाबत ही निविदा काढण्यात आली आहे. त्यासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक २९, ३०, ५३, ५४ साठी १ कोटी ९३ लाख रुपये, वॉर्ड क्र. ४०, ४१, ५०, ५६ साठी १ कोटी ९७ लाख, वॉर्ड क्र. ४२, ४३, ४४ साठी १ कोटी – ९५ लाख, वॉर्ड क्र. ५१,५२, ५७, ५८ साठी १ कोटी ८८ – लाख, वॉर्ड क्र. २७, २८ आणि ४९ साठी १ कोटी ९३ लाख, वॉर्ड क्र. १६, २१, २२, २३, २४ साठी १ कोटी ■ ९७ लाख, वॉर्ड क्र. ६, ९, १०, १५, ३ यासाठी १ कोटी – ९७ लाख, वॉर्ड क्र. १, २, ४, ५, ७ साठी १ कोटी ९८ – लाख, वॉर्ड क्र. ८, ११, १२, १७ साठी १ कोटी ९६ – लाख, वॉर्ड क्र. ३१, ३२, ३३, ३४ साठी १ कोटी ७५ लाख, वॉर्ड क्र. १३, १८, १९, २६ साठी १ कोटी ७२ लाख, वॉर्ड क्र. १४, २०, ३८ साठी १ कोटी ४८ लाख, – वॉर्ड क्र. ३५, ३६, ३७ साठी १ कोटी ५६ लाख, वॉर्ड क्र. ४६, ४७, ४८ साठी १ कोटी ७९ लाख, वॉर्ड क्र. २५, ४५, ५५ साठी १ कोटी ७० लाख, तसेच स्वच्छता – कर्मचारी, चालक, मदतनीस यांच्यासाठी १ कोटी ८६ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे