अंबा भवन परिसरातील नाल्याजवळ सातत्याने कचरा टाकला जात असल्याने निर्माण झालेला ब्लॅक स्पॉट हटवण्यासाठी बेळगाव महापालिकेच्या वतीने सुशोभीकरणाचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत नाल्यालगत कचरा टाकणे कायमस्वरूपी थांबावे, यासाठी छोटे उद्यान उभारण्यात आले आहे.
हा उपक्रम नगरसेविका सौ. वैशाली भातकांडे यांच्या पुढाकाराने यशस्वीरीत्या राबवण्यात आला. परिसर सुशोभित केल्याने नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून, परिसराचे सौंदर्यही खुलणार आहे.
या कार्यक्रमास महापालिका आयुक्त एम. कार्तिक,
आमदार राजू शेठ,
तसेच नगरसेवक रवी साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक करत, अशा प्रकारचे उपक्रम शहरातील इतर ठिकाणीही राबवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या वेळी नागरिकांना नाल्याजवळ कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले असून, स्वच्छ बेळगाव – सुंदर बेळगाव या संकल्पनेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

