Share News

हेस्कॉम बेळगाव येथे पॉवरमॅन दिवस व विद्युत सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा

शहर उपविभाग 3, हेस्कॉम, बेळगाव कार्यालयात खाद्री सर (हेस्कॉम अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली पॉवरमॅन दिवस तसेच विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.
या सप्ताहानिमित्त हेस्कॉम अध्यक्ष, मुख्य अभियंता प्रविण कुमार चिकडे, अधीक्षक अभियंते शिवाजी खरे, कृष्णप्पा, सुतार, श्री राठोड, दीपक (हेस्कॉम/केपीटीसीएल), कंत्राटदार संघाचे प्रतिनिधी तसेच विभाग व उपविभागातील अधिकारी, कर्मचारी संघटनेचे संघटन सचिव 659, अनुसूचित जाती व जमाती संघटनेचे संघटन सचिव आणि आपल्या प्रिय पॉवरमॅन बंधूंनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमात ज्योती प्रज्वलित करून, सुरक्षा मंत्र वाचून, केक कापून आणि वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हेस्कॉम/सरकारच्या ध्येय-धोरणांचे पालन, ग्राहक सेवा, तसेच पॉवरमॅनच्या आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत माननीय अध्यक्ष आणि उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनपर विचार मांडले.
अशा प्रकारे सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला


Share News