मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर मध्ये आय.डि.बी.आय. बँक कडून तिजोरी व ग्रीन बोर्ड मोठ्या दिमाखात उद्धाटन
शाळेमध्ये शनिवार दिनांक – 07/03/2026 रोजी पालक सभेचे औचित्य साधून ग्रीन बोर्ड व तिजोरी कपाटचे मोठ्या दिमाखात उद्घाटन या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटी चे उपाध्यक्ष श्री जोतिबा यल्लाप्पा उडकेकर हे होते प्रमुख पाहुणे आय.डी.बी.आय. बँक कॉलेज रोड बेळगाव चे डि.जी.एम.मॅनेजर श्री चार्ल्स राजा जे., तसेच आर.पी.डी. क्रॉस शाखा मॅनेजर श्री .अनिल नाईक, मुख्य शाखेचे ए.जी.एम. मॅनेजर रोहित हिरामणी व शाळेचे माजी विद्यार्थी सन्मित्र सोसायटीचे चेअरमन श्री राजकुमार पाटील यांच्या पर्यंतनातून आय.डी.बी.आय. बँक कडून हि 90 हजार रुपये ची वस्तू देणगी स्वरुपात शाळा मिळाली पहिल्यांदा शाळेच्या विद्यार्थीनी ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी फोटो पूजन करण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री राजेन्द्र चलवादी यांनी केले यांनतर सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेच्या सहशिक्षिका सौ. ऐश्वर्या मेणसे यांनी केले त्याच बरोबर शाल, पुष्पहार घालून व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आले यानंतर आय.डी.बी.आय. बँक चे मॅनेजर आपल्या विचारांतून विद्यार्थ्यांना धावत्या युगात यशस्वी होण्यासाठी उच्च शिक्षण घेणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले त्याच बरोबर शाळेचे माजी विद्यार्थी सन्मित्र सोसायटीचे चेअरमन श्री राजकुमार पाटील यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांचे ,शिक्षकांचे ,एस.डी.एम.सी.व पालकांचे कौतुक करत शाळेत दिलेले जाणारे मातृभाषेतून उत्तम शिक्षण आणि शाळेची प्रगती वाढत चाली आहे असे बोलत कौतुक केले त्याच बरोबर अध्यक्ष भाषण श्री.जोतिबा उडकेकर यांनी आपल्या विचारांतून देणगी दिलेल्या मान्यवराचे कौतुक करत धन्यवाद मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती एम. एस.मंडोळकर यांनी केले आभार सहशिक्षक श्री सातेरी पाखरे यांनी मानले या कार्यक्रमाला शाळा सुधारणा कमिटी चे सदस्य श्री दिनेश लोहार, श्री विजय धामणेकर सदस्या सौ.अलका कुंडेकर, श्रीमती शुभांगी मुतगेकर, सौ.रेश्मा काकतकर,सौ. राजश्री सुतार, सौ अर्चना देसाई, सौ.ज्योती पाटील, शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते

