KPTCL बेळगाव नागरिकांसाठी आवाहन
220 केव्ही नरेंद्र–कणाबरगी लाईन्सवर तातडीचे दुरुस्ती काम
बेळगाव : KPTCL आणि HESCOM च्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आज दुपारी 4 ते 7 या वेळेत 220 केव्ही नरेंद्र–कणाबरगी लाईन 1 व 2 वर तातडीचे दुरुस्ती काम (आपत्कालीन लाइन क्लिअर – LC) पार पडणार आहे.
या दरम्यान 220 केव्ही चिकोडी स्टेशन वरून सुमारे 80 मेगावॉट इतका मर्यादित विद्युतपुरवठा केला जाईल. बेळगाव स्टेशनवरून पुरवठा होणाऱ्या सर्व 110 केव्ही स्टेशनना खालील सूचना देण्यात आल्या आहेत :
• सर्व औद्योगिक फीडरवर 100% वीज पुरवठा कायम ठेवावा
• सर्व शहरी व व्यापारी फीडरवर 25% वीज पुरवठा कायम ठेवावा
• सर्व EIP/NJY फीडरवर वीज पुरवठा थांबविणार आहे
काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि विद्युत पुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत केला जाईल, असे 220 केव्ही बेळगाव कंट्रोल रूम ने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी आवाहन करण्यात आले आहे की, या तातडीच्या कामामुळे होणाऱ्या मर्यादित वीजपुरवठ्याची योग्य ती खबरदारी घ्यावी आणि सहकार्य करावे .

