महापौर प्रीती कामकर तर उपमहापौर हणमंत कोंगाली
बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी प्रीती कामकर तर उपमहापौरपदी हनुमंत कोंगाळी यांची निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणुकीत भाजपने आपले बहुमत कायम राखत दोन्ही पदांवर विजय मिळवला.
महानगरपालिकेत वर्चस्व असलेल्या भाजपने जातीय समीकरण साधत महापौरपद नेकार समाजाला तर उपमहापौरपद लिंगायत समाजाला देत महत्त्वाचा राजकीय डाव साधला. प्रीती कामकर आणि हनुमंत कोंगाळी यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि बहुमताच्या जोरावर त्यांनी विजय मिळवला.
काँग्रेसकडून महापौरपदासाठी खर्शीद मुल्ला आणि उपमहापौरपदासाठी मोदिनसाब मतवाले यांनी निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.
निवडीनंतर महानगरपालिकेत भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

