Share News

राकसकोप धरणाची महापालिका आयुक्तांकडून पाहणी; आता मेपर्यंत पाणीटंचाईची चिंता नाही

बेळगाव : पश्चिम घाट आणि तिलारी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे राकसकोप धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त कार्तिक एम. यांनी सोमवारी धरणाला भेट देऊन पाण्याची पातळी, आवक-जावक आणि धरणाच्या क्षमतेची पाहणी केली.

यावेळी आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले की, राकसकोप आणि हिडकल या दोन्ही धरणांतून शहराला सध्या एकूण १०५ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत बेळगाव शहराला पाणीटंचाई भासणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पावसाअभावी काही महिन्यांपूर्वी राकसकोप धरणातील पाणीसाठा संपल्याने शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, सध्या धरण पूर्ण भरल्याने परिस्थिती सुधारली आहे. शहरातील १० प्रभागांमध्ये पुन्हा २४ तास पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, उर्वरित ४८ प्रभागांमध्येही आता दोन ते तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे.

यावेळी केयूडीएफसीचे अभियंते, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


Share News