Share News

शुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद

पती ने केली पत्नीला मारहाण

काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शुल्लक कारणावरून पती पत्नीमध्ये वाद होऊन पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना कुद्रेमणी गावामध्ये घडली आहे. नातेवाईकांच्या घरी मटन जेवणाचे आमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे मुले शाळेला न जाता घरी होती. त्यामुळे रागावलेला पती एकनाथ कांबळे आणि त्याच्या बहिणीने मिळून पत्नी प्रेमिला कांबळे यांना मारहाण असा आरोप प्रेमीला कांबळे यांनी केलाय.

आठ वर्षांपूर्वी प्रमिला कांबळे यांचे एकनाथ कांबळे यांच्याशी लग्न झाले होते. घरातील छोट्या छोट्या गोष्टीवरूनही एकनाथ कांबळे ओरडायचे आणि वारंवार मारहाण करायचे गेल्या काही दिवसांपासून तिच्या बहिणींनी मिळून तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप प्रमिलाची आई इंदुबाई माळकर यांनी सुद्धा केला आहे. त्यांच्याविरुद्ध काकती पोलीस ठाण्यात सुद्धा तक्रार करण्यात आली आहे


Share News