Share News

लोकसभा निवडणूक: काँग्रेस पक्षाला यांचा पाठिंबा

कित्तूर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटकासह राज्यभरातील सर्व 28 लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी डॉ बी.आर. आंबेडकर फेडरेशन ऑफ दलित संघटनांच्या वतीने मतदारांना आवाहन करून काँग्रेसला मतदान करण्याची विनंती केली .

राज्यभरातील कित्तूर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटकासह सर्व लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांना बाह्य समर्थन देण्यासाठी युनियनच्या राज्य समितीद्वारे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ही माहिती देण्यात आली

यावेळी काँग्रेस आणि भाजप/एनडीएला आपली संघटना पाठिंबा देत असल्याची माहिती देण्यात आली असून बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर आणि प्रियंका जारकीहोळी यांना मतदान करण्याची मागणी यावेळी पत्रकार परिषदेत दलित संघटनेने केली.


Share News