Share News

न्यायालयाच्या आवारात पाक समर्थक घोषणा दिल्याच्या आरोपावरून वकिलाने आरोपीला केली बेदम मारहाण

काही महिन्यापूर्वी आरोपीने कारागृहातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आलोक कुमार यांना दिली होती जीवे मारण्याची धमकी

 

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आयपीएस अधिकारी अलोकुमार यांच्या जीवाला धोका निर्माण करणारा आरोपी जयेश पुजारी कोर्टात हजर झाला तेव्हा त्याने पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्या.
न्यायालयाच्या आवारात पाक समर्थक घोषणा दिल्याच्या आरोपावरून वकिलाने एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना आज घडली.

बेळगाव न्यायालयाचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो याच ठिकाणी एका आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याने पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या त्यामुळे बेळगावमधील एका वकिलाने तरुणाला कोर्टात येताना पाक समर्थक घोषणा दिल्याच्या आरोपावरून बेदम मारहाण केली. यावेळी एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेतले.
काही महिन्यापूर्वी सदर आरोपीने कारागृहातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आलोक कुमार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.


Share News