बेळगाव पोलिसांनी केला अभर्क तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश
आतापर्यंत पाच जणांना अटक
माळ मारुती पोलीस स्टेशनमध्ये बालक विक्रीचा गुन्हा
बेळगाव पोलिसांनी अभर्क तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश केला आहे याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. बेळगाव शहराचे पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांनी याबाबत माहिती दिली आहे .जिल्ह्यात लहान मुलांची तस्करी करणारे नेटवर्क आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय
याप्रकरणी जिल्हा बाल संरक्षण युनिटचे शासकीय दत्तक केंद् रसंयोजक राजकुमार सिंगाप्पा राठोड यांनी माळ मारुती पोलीस स्टेशनमध्ये बालक विक्रीचा गुन्हा नोंदवला आहे .
याघटनेतील आरोपी महादेवी ऊर्फ प्रियांका बाहुबली जैनर (रा. नेगीनहाळ, ता. बैलहोंगल), डॉ. अब्दुलगफार हुसेनसाब लाडखान (मूळ रा. हंचिनाळ, ता. सौंदत्ती, सध्या रा. सोमवार पेठ, कित्तूर), चंदन गिरीमल्लाप्पा सुभेदार (रा. तुरकर शिगेहळ्ळी, ता. बैलहोंगल), पवित्रा सोमाप्पा मडीवाळकर (रा. संपगाव, ता. बैलहोंगल) व प्रवीण मंजुनाथ मडीवाळकर (रा. होसट्टी, ता. जि. धारवाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
प्रेमसंबंधातून जन्मलेले परंतु प्रेमीयुगुलाला नको असलेले एक महिन्याचे अर्भक डॉक्टरसह काहींनी विकण्याचा प्रयत्न केला. कंपाऊंडर व डॉक्टरने ते ६० हजारांना विकले, तर ज्या नर्स महिलेने ते विकत घेतले तिने ते दीड लाखाला बेळगावात आणून तिसऱ्याला विकण्याचा प्रयत्न केला. यावेळी माळमारुती पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले असता तिने दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली
यावेळी 60,000 रुपये मिळाल्यानंतर मुलाला एकूण 1,40,000/- रुपयांना विकले गेल्याची नोंद आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची माहिती खोटी ठरवली जात आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच खरे सत्य समोर येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.