वाढदिवसाला बोलवून केला मित्राचा खून
वैयक्तिक भांडणातून खून
मुरुगोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
वाढदिवसाला फोन करून मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री यरगट्टी तालुक्यातील नुग्गंटी गावात घडली.या घटनेत
बसवराज गुरुलिंगप्पा मुद्दन्नावरा ( वय २३) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलेल्या वैयक्तिक भांडणातून चार-पाच जणांनी एकत्र येऊन बसवराजचा खून केला आणि पळ काढला. याप्रकरणी मुरुगोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.