बेळगाव ब्रेकिंग
सावत्र आईने चिमुकीची हत्या केल्याचा आरोप
3 वर्षाच्या चिमुकलिची बेळगावात हत्या
समृद्धीच्या सख्या आईची हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
एपीएमसी पोलीस ठाण्यात सावत्र आई विरोधात गुन्हा दाखल
बेळगाव जवळील कंग्राळी के.एच. गावात तीन वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून चिमुकीच्या आजी आजोबांनी सावत्र आईवर गुन्हा दाखल केला आहे .समृद्धी रायन्ना न्हावी वय 3 असे मृत बालिकेचे नाव आहे
समृद्धीची सावत्र आई सपना न्हावी हिच्यावर तीन वर्षांच्या समृद्धीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
समृद्धीचे आजी आणि काका यांनी सपना यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केलेले रायन्ना सीआरपीएफमध्ये शिपाई आहेत.
रायन्नाच्या कुटुंबावर त्याची पहिली पत्नी भारतीची हत्या केल्याचा सुद्धा आरोप आहे. 2021 मध्ये नागपूर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या प्रकरणातही रायण्णा आरोपी होता.
तर आता सावत्र आईने सुद्धा हत्या केली असल्याचा आरोप करण्यात आलाय बेळगाव एपीएमसी पोलीस ठाण्यात चिमुकलीच्या हत्येप्रकरणी रायण्णा कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.