Share News

टीसीसह चार जणांवर चाकूने हल्ला
चालुक्य एक्सप्रेस मध्ये पाच जणांवर चाकूने हल्ला
चाकूने वार करून आरोपी फरार
चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू

तिकीट बघण्यासाठी आलेल्या टीसीवर मास्क घातलेल्या एका युवकाने चाकूने पाच जणांवर जीवघेणा हल्ला केला आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लोंढा येथे ही घटना घडली आहे.
चाकूने हल्ला करून गुन्हेगार फरार झाला आहे.या घटनेत टीसीसह चौघांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिकीट तपासात असताना एका मास्क घातलेल्या युवकांने पाच जणांवर चाकूने हल्ला केला.या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे देवर्षी वर्मा वय 23 या असे या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे

याबाबत माहिती अशी की चालुक्य एक्सप्रेस हि ट्रेन धारवाड होऊन बेळगाव कडे निघाली होती. बेळगावहून चालुक्य एक्सप्रेस पॉन्डिचेरी मुंबई दिशेने रवाना झाली होती. यावेळी ही ट्रेन खानापूर लोंढा येथे आली असता ( चालुक्य एक्सप्रेस ) मध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तींकडून टीसी ने तिकीट मागत असताना हा प्रकार घडला आहे. यावेळी पाच जण गंभीर जखमी झाली तर त्यातील एकाचा मृत्यू झाला. जखमींवर त बेळगावातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.


Share News