Share News

गांधी नगरच्या युवकाचा स्क्रू ड्रायव्हरने केला खून

बेळगावात एका तरुणाची स्क्रू ड्रायव्हरने भोसकून हत्या करण्यात आली आहे. शहरातील महांतेश नगर पुलाजवळ ही घटना आज दुपारच्या सुमारास प्रेम प्रकरणातून घडली आहे.

बेळगाव गांधी नगर येथील रहिवासी इब्राहिम गौस (२२) असे या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे . त्याचे एका तरुणीवरती प्रेम होते .

इब्राहिम दुचाकीवरून जात होता हे पाहून तरुणीच्या भावाने मुझ्झामिल सतीगेरी याने स्क्रू ड्रायव्हरने त्याचा खून केला. यावेळी नागरीकांनी जखमी इब्राहिमला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र इब्राहिमचारुग्णालयात मृत्यू झाला.
माळ मारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे


Share News