मतांसाठी दारूचा खेळ उघड! माळ मारुती पोलिसांकडून ८०० बॉक्स दारू हस्तगत
जिल्हा परिषद निवडणुकीत दारू वाटपाचा डाव फसला;
माळ मारुती पोलिसांची मोठी कारवाई; ८०० बॉक्स दारू जप्त
महाराष्ट्रात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव माळ मारुती पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ८०० बॉक्स दारू जप्त केली आहे. ही दारू मतदारांना वाटप करण्यासाठी आणली जात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास माळ मारुती पोलीस करत आहेत.

