ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या (AIBSS) बेळगाव जिल्हाध्यक्षपदी
मंजूनाथ धनसिंग पम्मार यांची निवड
बेंगळूरू :
ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या (AIBSS) ७३ व्या स्थापना दिनानिमित्त बेंगळूरू येथील विधानसौध आमदार भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात बेळगाव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी मंजुनाथ धनसिंग पम्मार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ही निवड संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. डी. राम नायक, राज्याध्यक्ष श्री. विजय जाधव, टांडा विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा श्रीमती जलजा नायक, तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे निकटवर्तीय सेवानिवृत्त अधिकारी श्री. हिरानायक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी संघाचे राज्य पदाधिकारी, तसेच राज्यभरातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी श्री. पम्मार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर श्री. मंजीनाथ पम्मार यांनी संघाच्या विश्वासास पात्र ठरून समाजहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

