स्वतःच्या जीव धोक्यात घालून रस्त्यावर लोटांगण
तरुण स्वतःच्या जीव धोक्यात घालून रस्त्यावर लोटांगण घालत आहे.असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे .सध्या बेळगाव -गोवा चोर्ला घाटात वर्षा पर्यटनाला बहर आला आहे. तथापि मद्यपींच्या उपद्व्यापामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशीच एक घटना सध्या घडली आहे. मद्यधुंद तरुणाने धोधो पावसात रस्त्याच्या मधोमध नागिन डान्स केल्याने रहदारीला अडथळा झाला होता. सदर तरुणाचा पावसात नाच करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा तरुण स्वतःच्या जीव धोक्यात घालून रस्त्यावर लोटांगण घालत आहे. विशेष म्हणजे त्याचे मित्र या प्रकारचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रण करत त्याला प्रतिसाद देऊन खतपाणी घालत असल्याने वाहनांना वाट काढणे कठीण झाले होते. पोलिसांनी गस्त घालून असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे