आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला
बेळगावातील कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीच्या पुलावरुन एका व्यक्तीने मानसिक अस्वस्थतेच्या कारणांनी उडी मारून आपले जीवन संपविले. बेळगावातील वीरभद्र नगर येथील सुनील सदाशिव गुंडाप्पा वय 48 या व्यक्तीला दारूचे व्यसन होते. दारूच्या व्यसनातून मानसिक झाल्याने त्याने काल मार्कंडेय नदी पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या केली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह शोधला मात्र तो कोठेही सापडला नाही.
दरम्यान आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मृतदेह काही व्यक्तींना तरंगताना दिसून आला. यावेळी गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनाकरिता जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला