यांना मिळाली मेडिकल सर्जिकल नर्सिंग) या विषयात डॉक्टरेट पदवी
कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट,घटप्रभा येथील प्राध्यापिका. वृषाली उर्फ सई शेखर पाटील यांनी “कर्नाटकातील निवडक रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये आढळलेल्या जीवनशैलीतील बदलांबद्दलच्या होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण व अध्ययन (मेडिकल सर्जिकल नर्सिंग) या विषयात डॉक्टरेट पदवी मिळविली आहे. मध्य प्रदेश येथील मालवांचल विद्यापीठ इंदोर मधून ही डॉक्टरेट पदवी संपादित केली. हे विद्यापीठ भारतीय परिचारिका परिषद (Indian Nursing Council) मान्यताप्राप्त दर्जाचे आहे. यापूर्वी प्रा. सई पाटील यांनी कर्नाटकातील राजीव गांधी वैद्यकीय विद्यापीठातून एमएससी नर्सिंग ही पदवी संपादित केली. त्यानंतर त्यांनी बेळगाव शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ नर्स म्हणून काम पाहिले. हे करत असताना त्यांनी वरील विषयावर प्रबंध सादर केला. त्यानंतर त्यांना सदर विद्यापीठाने डॉक्टरेट ही पदवी बहाल केली. प्रा. सई पाटील यांनी सुरुवातीपासूनच वैद्यकीय क्षेत्रामध्ये विविध विभागात काम केले आहे. त्या स्व. प्रा. सी. व्ही. पाटील यांच्या स्नुषा होत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

