Share News

दहावीचा निकाल लागणार उद्या |वाचा सविस्तर बातमी

एसएसएलसी च्या विद्यार्थ्यांना आतुरता लागलेल्या निकाल आता उद्या लागणार आहे. उद्या गुरुवार दिनांक 9 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
निकालासाठी शिक्षण विभागाने सर्व तयारी पूर्ण केली असून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्या कळणार आहे.
10.30 वाजता निकाल जाहीर करण्यात येणार असून शासनाच्या https://karresults.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येऊ शकणार आहे

दहावीची परीक्षा 25 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत झाली होती. 2750 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती
यंदा एकूण 8 लाख 69 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 4 लाख 41 लाख विद्यार्थी तर 4 लाख 28 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्याचा आता उद्या निकाल लागणार आहे.

उद्या शिक्षण विभागाच्या वतीने पत्रकार परिषद पार पडल्यानंतर हा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची उत्सुकता सुद्धा शिगेला पोहोचली आहे.


Share News