एस एस एल सी परीक्षेत यंदा बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याने 64.93% निकालासह 29 वा नंबर पटकाविला आहे. कर्नाटक एसएससी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाल्यानंतर याकडेवारी पुढे आली आहे.यावर्षी बेळगाव व चिकोडीच्या निकालाची टक्केवारी घटली असून गतवर्षी तेराव्या स्थानावर असलेल्या बेळगावच्या तीन तर चिकोडीची 12 व्या स्थानांनी घसरण झाली आहे.
राज्यभरातून 76.91% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. एसएससी परीक्षेत राज्यात बागलकोट येथील मेलीगिरी मोरारजी निवासस्थानातील अंकिता बसाप्पा ही राज्यात प्रथम आली आहे. तिने 625 पैकी 625 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला आहे
तर द्वितीय क्रमांक दोघांनी पटकाविला असून यामध्ये एक मुलगी आणि एका मुलाने बाजी मारली आहे मेधा शेट्टी आणि सिद्धांत नाईकबा यांनी 625 पैकी 624 गुण मिळवत राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.