दहावीच्या परीक्षेत डिव्हाईन प्रोव्हीडन्स शाळेची श्रेया लाड या विद्यार्थिनींनीही आपल्याला मिळालेले गुण कमी असून त्याची फेर तपासणी करावी असा अर्ज बोर्डाकडे गेला होता आपल्याला मिळालेले गुण हे कमी पडले असल्याची खात्री तिला होती त्यामुळे तिने आपले पेपर पुन्हा तपासले जावे याकरिता अर्ज केला होता. त्यानुसार बोर्डाने फेर तपासणी करून तिचे हिंदी विषयात चार गुण वाढून दिले त्यामुळे तिला इंग्रजी 122 कन्नड 100 हिंदी 100 विज्ञान 100 गणित 99 समाज विज्ञान 100 (625 पैकी 621) 99.36% गुण मिळाल्याचे बोर्डाने कळविले आहे. तिचे दहावी परीक्षेत मिळालेले गुण हे इतर विद्यार्थिनी पेक्षा जास्त आहेत त्यामुळे श्रेया लाड हीच जिल्ह्यात दुसरी आली असल्याचे जाहीर करण्यात आले. तिला शिक्षक दीपक शिंदे (विद्या क्लाससेस) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.