राजकोट किल्यावरील दोन्ही गटाच्या राड्यात तटबंदी तुटून पडली
मालवण मध्ये दोन्ही गटाकडून राडा
दोन्ही गटाकडून हेच दगड एकमेकांवर फेकून मारण्यात आले.
सोमवारी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी महाविकास अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये निषेध व्यक्त केला जातोय. बुधवारी सकाळी सावंतवाडी येथे शासकीय विश्रागृहावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी मालवण येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला.
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना स्थळी नारायण राणे समर्थक व आदित्य ठाकरे समर्थक आमने सामने आले. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, एकमेकांवर दगडफेक करण्यात आली यात काही महिला, पोलिस जखमी झाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ठिकाणी पुतळा उभारण्यात आला होता, त्याच ठिकाणी सुशोभीकरणासाठी दगडांची तटबंदी करण्यात आली होती. दोन्ही गटाच्या राड्यात तटबंदी तुटून पडली. याचवेळी दोन्ही गटाकडून हेच दगड एकमेकांवर फेकून मारण्यात आले.