शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे शिवाजी पाटील यांचा विजय निश्चित
अनिरुद्ध रेडेकर यांचा कार्यकर्त्यांसह शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा जाहीर
चंदगड : चंदगड मतदारसंघाचा विकास व्हायचा असेल तर शिवाजीराव पाटील यांच्यासारखा व्हिजन असलेला दूरदृष्टीचा नेता हवा. मतदारसंघाचा खुंटलेला विकास ही करण्याची धमक फक्त अन् फक्त शिवाजीराव पाटील यांच्यात आहे. त्यामुळे माझी सर्व शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचे मत अनिरुद्ध रेडेकर यांनी सांगितले. सावर्डे येथे शिवाजीराव पाटील यांना आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाठिंबा जाहीर केला.
रेडेकर पुढे म्हणाले, शिवाजीराव यांचे वरिष्ठ पातळीवरील संबंध आणि मतदारसंघाच्या विकासासाठी असलेली तळमळ ही इतर नेत्यांच्या तुलनेत वेगळी आहे. त्यामुळे या मतदारसंघाला पाटील यांची गरज आहे.
यावेळी शिवाजी पाटील म्हणाले, विकासाची दूरदृष्टी असलेल्या कै. केदारी रेडेकर यांचे सुपुत्र व एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिरुद्ध रेडेकर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या लोकसंपर्काचा मला नक्की फायदा होणार असून भविष्यात त्यांच्या पाठीशी राहणार आहे .
त्यांचा पाठिंबा हा माझ्या विजयाची नांदी असून पुढील काळात अनिरुद्ध रेडेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कुठे ही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
यावेळी मल्हार शिंदे, चाळोबा देसाई, शिवसेना चंदगड विधानसभा प्रमुख मारुती नावलगी , बाबू नेसरीकर यांचासह सर्व कार्यकर्तें उपस्थित होते.