प्रतिभा कारंजी स्पर्धेत आधार स्कूल विद्यार्थ्यांचे यश
बेळगाव प्रतिनिधी
आधार एज्युकेशन सोसायटी संचालित आधार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रतिभा कारंजी स्पर्धेत यश संपादन केले आहे. शिक्षण खात्याच्या वतीने
नुकत्याच पार पडलेल्या क्लस्टर लेव्हल ‘प्रतिभा कारंजी ‘स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.
कंठ पाठ स्पर्धा पहिला क्रमांक – खातीजा सनदी (इयत्ता सहावी)
कंठ पाठ स्पर्धा दुसरा क्रमांक -वरदनेश्वरी (इयत्ता सहावी)
आणि अभिनय गीत स्पर्धेत तिसरा क्रमांक -खादिजा बळीगार (इयत्ता चौथी) यांनी मिळविला.
सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका जरीना , रूपा व रश्मी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच शाळेच्या प्राचार्य गीता पासलकर आणि प्रशासकीय अधिकारी राजेश शेकदार यांचे प्रोत्साहन लाभले.

