जायंट्स इंटरनॅशनल कन्वेक्शन गोल्डन जुबली समारंभास बेळगावच्या सदस्यांची राहणार उपस्थिती
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन मधील 35 सभासद आज 12 रोजी पहाटे चार वाजता कोल्हापूर ते धनबाद या रेल्वे गाडीने मथुरा वाराणसी येथे होणाऱ्या जायंट्स इंटरनॅशनल कन्वेक्शन गोल्डन जुबली समारंभाला बेळगाव मधून 35 सभासद मेंबर रवाना झाले आहेत सदर कन्व्हेन्शन दिनांक 19. 20 .21. –2025 रोजी होणार असून या अगोदर सर्व सभासद अयोध्या राम मंदिर काशी मधील विश्वेश्वर मंदिर काळभैरव नंतर आग्रा मधील ताजमहल फोर्ट प्रयागराज मधील त्रिवेणी दिल्लीमधील लाल किल्ला अक्षरधाम मंदिर आशा प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार आहेत यावेळी फेडरेशनचे युनिट डायरेक्टर शिवानंद हिरेमठ संजय पाटील उमेश पाटील अरुण काळे जयंत पाटील वायन पाटील विजय पाटील अशोक हलगेकर अनंत कुचेकर मुकुंद महागावकर मधु बेळगावकर अरविंद देशपांडे अरविंद पालकर अनंत कुलकर्णी सौ सुवर्णा काळे विमल पाटील धनश्री महागावकर अनिता पाटील हे सभासद उपस्थित राहणार आहेत

