किल्ले रायगडला अनेक कार्यकर्ते रवाना
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने किल्ले रायगड येथे संघटनेच्या वतीने कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन बेळगावसह सीमाभागात मराठी अस्मितेची जागृती व सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी मराठी सन्मान यात्रेची सुरुवात करणार आहेत,मराठी अस्मितेसाठी *लढा नाहीतर गुलामगिरीची सवय होईल* हा नवीन युवकांपर्यंत संदेश घेऊन ही मोहीम सुरू राहणार आहे
हे कार्यकर्ते किल्ले रायगड येथे रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी पोहचणार असून दिनांक 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताकदिनी पहाटे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मोहिमेची सुरुवात करणार आहेत.
या उपक्रमासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते शनिवार दिनांक 24 जानेवारी रोजी अनेक कार्यकर्ते रात्री उशिरा रवाना झाले.
यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील,सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार नगरसेवक शिवाजी मंडोळकर,उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर,अशोक घगवे,सचिन दळवी, सुरज जाधव,श्रीकांत नांदवडेकर,शिवाजी हवळांनाचे,वैभव कुट्रे,भूपाल पाटील,राजू पाटील,महादेव पाटील,मोतेश बारदेशकर,महेंद्र जाधव, निखिल देसाई,रमेश माळवी,प्रकाश हेब्बाजी,आनंद वाडेकर, शिवराज यलजी,विनायक मजुकर,अमित पाटील,अमोल चौगुले,भाऊ पाखरे,ओमकार बैलूरकर आदी उपस्थित होते.

