Share News

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेत पत्रकारांचा सन्मान

येळ्ळूर : येथील मराठी मॉडेल शाळेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध दैनिके व डिजिटल माध्यमातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्षा सौ. दिव्या कुंडेकर होत्या.

याप्रसंगी दै. तरुण भारतचे येळ्ळूर वार्ताहर श्री. बी. एन. मजूकर, दै. सकाळचे वार्ताहर श्री. सी. एम. गोरल, डिजिटल मीडियामधून बेळगाव वार्ता न्यूजचे संपादक श्री. सुहास हुद्दार, न्यूज २४ तास मराठीचे संपादक श्री. रोहन पाटील, बेळगाव केसरी न्यूजच्या प्रतिनिधी अक्षता देसाई नाईक (देसाई ) तसेच डी. मीडियाचे संपादक श्री. दीपक सुतार उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. त्यानंतर शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक, एसडीएमसी अध्यक्ष-उपाध्यक्ष, सदस्य व शिक्षकवृंद यांच्या वतीने पुष्पहार, शाल व मानचिन्ह देऊन सर्व दैनिकांचे प्रतिनिधी व डिजिटल मीडियाच्या संपादकांचा सन्मान करण्यात आला.

यानंतर दै. सकाळचे वार्ताहर श्री. सी. एम. गोरल यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, एसडीएमसी पदाधिकारी तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

एसडीएमसी उपाध्यक्ष श्री. जोतिबा उडकेकर यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील विविध उपक्रमांचे दर्जेदार वृत्तांकन करणाऱ्या दैनिक व डिजिटल माध्यमातील पत्रकारांचे कौतुक करून आभार मानले.

अध्यक्षीय भाषणात सौ. दिव्या कुंडेकर यांनी शाळेतील उपक्रम समाजापर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगून, यामुळे शाळेचा नावलौकिक वाढत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच त्यांनी सर्व सत्कारमूर्तींचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका श्रीमती एम. एस. मंडोळकर यांनी केले, तर सहशिक्षिका सौ. ऐश्वर्या मेणसे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र चलवादी, एसडीएमसी सदस्य श्री. मुर्तीकुमार माने, श्री. मारुती यळगुकर, श्री. चांगदेव मुरकुटे, श्री. दिनेश लोहार, श्री. जोतिबा पाटील, श्री. शशिकांत पाटील, श्री. विजय धामणेकर, सदस्या सौ. प्रियंका सांबरेकर, सौ. अलका कुंडेकर, सौ. रेश्मा काकतकर, सौ. मयुरी कुगजी, सौ. राजश्री सुतार, श्रीमती शुभांगी मुतगेकर, सौ. अर्चना देसाई, सौ. ज्योती पाटील, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share News