पाडकामादरम्यान भिंत कोसळली — कामगाराचा मृत्यू
मुरगोड हद्दीत दुर्घटना — तुकाराम कुरी जागीच ठार
जुन्या इमारतीचे पाडकाम ठरले जीवघेणे
गोकाक तालुक्यातील मजूराचा दुर्दैवी अंत
भिंत कोसळून गंभीर जखमी — मृत्यूची नोंद
जुन्या दुकानाच्या इमारतीचे पाडकाम सुरू असताना अचानक भिंत कोसळून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तुकाराम कुरी (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
मृत तुकाराम कुरी हे गोकाक तालुक्यातील लोळसूर गावचे रहिवासी असून, ते मजूर म्हणून इमारत पाडकामासाठी आले होते.
ही घटना मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पुढील तपास सुरू आहे.

