प्रवीण तोगाडिया यांच्या गाडीला अपघात
त्यांच्याच ताफ्यातील पोलीस वाहनाने दिली धडक
विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगाडिया यांच्या गाडीला अपघात झाला आहे. हुबळी – विजापूर मार्गावरील जिरग्याळ बायपासनजीक एस्कॉर्ट वाहनाने धडक दिली.
बागलकोट जिल्ह्यातील मुधोळा येथील कार्यक्रम संपवून जमखंडीकडे दुसऱ्या कार्यक्रमासाठी आपल्या वाहनातून जात असताना अपघात झाला.
सुदैवाने प्रवीण तोगाडिया यांच्यासह गाडीतील कुणीही जखमी झालेले नाही. प्रवीण तोगाडिया बसलेल्या वाहनाचा वेग कमी केल्याने, पाठीमागे असलेली एस्कॉर्ट पोलीस गाडी धडकली. धडकल्यामुळे बोलेरो तील दोन्ही एअरबॅग ओपन झाल्या.

