बेळगाव महानगरपालिकेकडून दोन नवीन शववाहिका सेवेत दाखल
बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या सेवेसाठी दोन नवीन शववाहिका सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या आणि आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता ही महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
नवीन शववाहिकांमुळे मृत व्यक्तींच्या पार्थिवाच्या वाहतुकीची सुविधा अधिक वेगवान, सुसज्ज आणि सुलभ होणार आहे. या वाहनांमध्ये आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून स्वच्छता आणि सुरक्षिततेचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागरिकांना वेळेत आणि सन्मानपूर्वक सेवा देणे हेच उद्दिष्ट असून, शहरातील विविध भागांमध्ये तत्काळ सेवा पोहोचवण्यासाठी या तीन नवीन शववाहिका उपयुक्त ठरणार आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी ही सेवा अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न असून, पुढील काळातही मूलभूत सेवांमध्ये सुधारणा करण्याचा मानस महानगरपालिकेने व्यक्त केला आहे.

