Share News

बेळगाकरांना आतुरता शिवजयंतीची – हम आयेंगे नही अंदाज मे

बेळगावकरांना आतुरता असते ती शिवजयंती त्यातही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चव्हाट यांच्या वतीने दाखल करण्यात येणारा सजीव देखावा हा वेगळ्या पद्धतीचा आणि आकर्षक असा असतो त्यांच्या सजीव रेखावा मध्ये जिवंतपणा जाणवते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण आहोत की काय असा भास देखावा पाहून होतो.

चव्हाट गल्ली ही वेगळे काहीतरी करण्यात नेहमी अग्रेसर असते. गणेशोत्सव असो , दसरा असो वा जोतिबाची पायी वारी असो वा शिवजयंती असो दरवर्षी वेगळी पण जपण्याचा चव्हाट गल्लीचा मानस आहे.

गेल्यावर्षी शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या शिवचित्र रथ मिरवणुकीमध्ये सजीव देखावा हा अंगावर रोमांचक उभे करणारा होता. तर यावर्षी चव्हाट गल्ली कोणता देखावा सादर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हम आयेंगे नही अंदाज मे असे म्हणत यावेळेस काय पहावयास मिळणार आणि नेमका कोणता धडाका करणार याची बेळगावकर आतुरतेने वाट पाहत आहे.


Share News