बेळगाव महानगर पालिका आणि स्मार्ट सिटीमधील बेकायदेशीर निधीच्या वापराविरुद्ध कारवाईची मागणी
बेळगावात विविध संघटनाचे आंदोलन
महानगर पालिकेतील भ्रष्टाचार हटविण्याची मागणी
बेळगाव स्मार्ट सिटी आणि महानगर पालिकेद्वारे शहरातील बँक ऑफ इंडिया ते जुना पी.बी. रोड, (छत्रपती शिवाजी गार्डनच्या शेजारी) रोड बेकायदेशीर आहे . येथील नागरिकांची घरे पाडून त्यांची मालमता जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आली होती ती परत करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात बेकायदेशीर बांधकाम आणि स्मार्ट सिटी निधीचा गैरवापर करणाऱ्या अधिकारी आणि राजकारण्यांवर कारवाई करावी याकरिता विविध संघटनांची मोर्चा काढून आंदोलन केले .
बेळगावातील विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी महानगर पालिकेला भ्रष्टाचारी विळखा बसला आहे तो सुटावा अशी मागणी निदर्शने करून करण्यात आली .सरदार हायस्कुल पासून सुरु झालेला मोर्चा महानगर पालिकेपर्यंत नेण्यात आला त्यानंतर आयुक्तांना निवेदन देण्यात आले