बेळगावात रास्ता रोको करून जेल भरो आंदोलन
राज्य आणि केंद्र सरकार विरोधात आंदोलन
फसवणुकीला बळी पडलेल्या कुटूंबियांचे रास्ता रोको करून आंदोलन
सन 2019 मध्ये सरकारने बर्डस ऍक्ट कायदा 2019 करून देशातील नागरिकांना ठेवी आणि अमर्याद ठेवींची हमी दिली होती ज्यामध्ये सरकार आणि संसदेने अर्जदारांना त्यांच्या ठेवींच्या दोन ते तीन पट रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते .21 फेब्रुवारी 2019 पर्यंत 180 दिवस आणि ज्या कंपन्यांनी त्यांच्या ठेवी परत केल्या नाहीत यामध्ये अनेक कुटुंबांनी कष्टाची कमाई घातली आहे मात्र परतावा मिळाला नसल्याने आज कर्नाटक राज्य शेतकरी संघटनाआणि हरित सेनेने मोर्चा काढून भव्य आंदोलन केले तसेच रास्ता रोको केला .यावेळी रास्ता रोको केलेल्या नागरीकांना अटक करण्यात आली.