श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बांगलादेश येथे काही दिवसांपासून हिंदू वरती अत्याचार होत आहेत. अनेक हिंदूंवरती हल्ले होत आहेत, तेथील हिंदूंमध्ये असुरक्षिततेचे, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक जण स्थलांतर करत आहेत. या विरोधात भारतीय सरकारने लवकरात लवकर पावले उचलावीत व तेथील हिंदूंना सुरक्षेची हमी द्यावी, तसेच कलकत्ता येथे डॉक्टर भगिनी वरती बलात्कार करून त्या भगिनीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यात अनेक जण आरोपी आहेत.सद्या एक आरोपी पकडला गेला आहे. त्याबरोबर इतर आरोपींना पकडुन, याचा तपास करून त्या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा द्यावी. अश्या दोन्ही मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने प्रांत प्रमुख श्री किरण गोविंदराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांच्या सहायकानी या निवेदनाचा स्वीकार केला. या दोन्ही घटनेचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जाहीरपणे निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील,विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण,प्रमोद चौगुले,किरण बडवानाचे, चंद्रशेखर चौगुले, प्रचारक हिरामणी मुचंडीकर प्रवीण मुरारी मोहन जोई संदीप पाटील गजानन निलजकर विठ्ठल सर विनायक कोकितकर अमोल केसरकर सागर पवार महेश जांगळे मल्लेश बडमंजि शिवाजी मंडोळकर अजित जाधव राहुल कुरणे मंगेश हरीहर प्रसाद धामनेकर अमित लगाडे राजू पोटे प्रतीक पाटील तसेच शेकडो कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी धारकरी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपस्थित होते.