Share News

विशाल गडावरील अतिक्रमण काढल्याबाबत बेळगावात निषेधात्मक मोर्चा

 

महाराष्ट्र सरकार आणि पोलीस प्रशासनाविरुद्ध आंदोलन

भर पावसात एसडीपीआयचे आंदोलन

 

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत रविवार दिनांक 14 जुलै रोजी गडावरून परत येताना मौजे गजापूर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळांचे नुकसान केले या घटनेच्या निषेधार्थ आज बेळगावातील मुस्लिम संघटना एसडीपीआयच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात मोर्चा काढून आंदोलन केले. मुस्लिम धर्मियांची घरे, दुकाने यासह अन्य ठिकाणी हल्ले करण्यात येत आहेत. तसेच या गोष्टीला महाराष्ट्र सरकार पोलीस प्रशासन हे देखील साथ देत आहेत हे मुसलमाना त्रास देण्याकरिता जाणून-बुजून करत असल्याचा आरोप एसडीपीआयच्या सदस्यांनी आज बेळगाव शहरात केला. त्यामुळे मुसलमानांना संरक्षण द्यावे त्यांची प्रार्थना स्थळे सुरक्षित ठेवावी या मागणीसाठी आज शहरात निषेधात्मक मोर्चा काढण्यात आला.


Share News