सिद्धरामय्या यांच्या पत्नीच्या नावे बुडामध्ये प्लॉट
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक
चन्नम्मा सर्कल मध्ये टायर जाळून केला निषेध
म्हैसूर अर्बन अथॉरिटी डेव्हलपमेंट मध्ये सिद्धरामय्या यांनी आपल्या पत्नीचे नावे प्लॉट देण्याचे काम कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने केले आहे. तसेच एसटी निगम मधून 200 कोटी रुपये काँग्रेसने हडप केले आहेत. त्यामुळे अनेक अधिकारी आपल्यावर हे सगळं खापर फुटणार या भीतीने आत्महत्या करत आहेत त्यामुळे भ्रष्टाचारात बुडालेल्या सरकारला जागृत करण्यासाठी आज बेळगावातील भाजप पक्षाच्या वतीने आंदोलन करून निषेध करण्यात आला यावेळी चनम्मा सर्कल मध्ये टायर जाळून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. आजच म्हैसूरमध्ये बुडा ऑफिसच्या कार्यालयाला भाजपचे राजाध्यक्ष विजेंद्रघेराव घालून आंदोलन करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर बेळगाव मध्ये देखील आज टायर जाळून आंदोलन करण्यात आले. भविष्यात जर काँग्रेस सरकार अशा प्रकारचे भ्रष्टाचार वारंवार करत असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई झाल्याशिवाय काँग्रेस सरकार गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.