राहुल गांधींच्या वक्तव्याच्या बेळगावात निषेध
राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी भाजपची मागणी
भाजप आमदार आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून केला निषेध
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसद भवनात हिंदूविरोधी केलेल्या वक्तव्याविरोधात आज वेळका वातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आणि रास्ता रोको करून राहुल गांधींचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
राहुल गांधी यांनी हिंदू विरोधात केलेले वक्तव्य चुकीचे आहे त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी बेळगावातील शहापूर येथील सिग्नल अडवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले तसेच आमदार अभय पाटील यांनी रस्त्यावर ठाण मांडून निषेध व्यक्त केला.