पेट्रोल आणि डिझेल दरवाढ केल्याने भारतीय जनता पक्षाचे आंदोलन
दुचाकी ला दोरी बांधून बैल जोडीच्या सहाय्याने आंदोलन
कर्नाटक राज्याने शनिवारी विक्रीकर सुधारित केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविले आहेत राज पत्रातील अधिसूचनेनुसार सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विक्रीकर अनुक्रमे 29.84% आणि 18.44% सुधारित केला आहे पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन नुसार कर्नाटक मध्ये पेट्रोलच्या किमती 3 रुपये आणि डिझेल 3.5% त्यामुळे बेळगावात आज पेट्रोल आणि डिझेल दरवाढ विरोधात आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. दुचाकी ला दोरी बांधून बैलगाडीची जोडी सह आंदोलन करून कर्नाटक सरकारने केलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेध व्यक्त केला. यावेळी कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथून या आंदोलनाला सुरुवात झाली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे आंदोलन छेडण्यात आले.P