Share News

चंदगड विधानसभेचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार शिवाजीभाऊ पाटील यांना कानडी गावाचा जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला आहे. चंदगड भागामध्ये विकासाच्या कामाची गंगा म्हणून सुपरिचित असलेले शिवाजी भाऊ यांना या वेळेला जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्याचा एक मताने निर्धार केल्यानंतर या कानडी गावातील सर्व नागरिकांनी थेट चंदगड सावर्डे येथील कार्यालयाला स्वतः भेट देऊन अपक्ष उमेदवार शिवाजीभाऊ यांची भेट घेऊन जयघोषामध्ये जाहीर पाठिंबा घोषित केला आहे . अनेक ज्येष्ठ नागरिकासह युवा काबर्यकर्ते व युवा युवती महिला वर्गासह अनेकांनी शिवाजीभाऊ यांची वैयक्तिक भेट घेतले.गावचा विकास साधने त्याच बरोबर विविध समस्या भविष्यात मार्गी लावण्या संदर्भात आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी शिवाजी भाऊंनी आश्वासन दिल्याने संपूर्ण कानडी गावाच्या नागरिकांनी जाहीर पाठिंबा घोषित केला, आणि निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला, यावेळी कानडी गावचे प्रमुख नामदेव हरेर, हंबीरराव पडते ,शिवाजी कांबळे ,विठ्ठल गडदे, नारायण सुभेदार, सदानंद जाधव, महादेव हरेर, महादेव जाधव, गावातील अनेक ग्रामस्थ व युवा, युवती ,महिला वर्गासह अनेक उपस्थित होते.


Share News