गोवा मार्गावर गेल्या 28 तासापासून वाहतूक ठप्प
रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा
इतर मार्ग ही अरुंद असल्याने वाहतूक ठप्प
गोवा -बेळगाव महामार्गावरील अस्तुली ब्रिज नजीक वाहने अडकत असल्याने बुधवार पहाटे आठ वाजल्यापासून सर्व वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूने चार ते पाच किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत .त्यामुळे बसेस तसेच छोटी वाहने चांदेवाडी कॅसरलॉक मार्गे धावत आहेत .परंतु तोही रस्ता अरुंद असल्याने दोन्ही बाजूने वाहने आल्याने त्या ठिकाणीही वाहतूक ठप्प झाली आहे . स्थानिक नागरिक येऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे. तर तिनेघाट तसेच इतर आजूबाजूच्या खेड्यातील नागरिकांना सदर रस्ता बंद झाल्याने रामनगर या ठिकाणी येण्यासाठी फार मोठा फेरा मारून यावे लागत आहे. अस्तूली ब्रिज या ठिकाणी वारंवार वाहने अडकत असल्याने उच्च अधिकाऱ्याने घटनास्थळी येऊन पाहणी करावी आणि येथील खड्डा बुजवून शाश्वत मार्ग सुरळीत करून देण्याचे मागणी करण्यात येत आहे.